Lifestyle

मोबाईलद्वारे शिक्षणाचे धडे ही पालकांसाठी डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- कोरोना महामारीत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. अशात काही शाळांनी ऑनलाईन अभ्यास सुरू केला आहे.

मात्र सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल नसल्याने ७५ टक्क्यांहून अधिक मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे.

तर अनेकांना रोजगार असला तरी दहा-बारा हजार रुपयांचा मोबाईल व त्यासाठीचे नेटपॅक घेणे परवडणारे नाही. खरवंडी केंद्रा अंतर्गत सोळा शाळा कार्यरत असून त्यामध्ये मराठी शाळा ११ तर माध्यमिक विद्यालये ५ आहेत.

गणेशवाडी मधील माध्यमिक विद्यालयात २२० पैकी केवळ ५० विद्यार्थी तर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत ९५ पैकी ५० टक्के तर भोगे वस्ती ३१ पट आहे पैकी ८० टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.

कारण ९५ टक्के मुले आदिवासी समाजातील आहेत. ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही शहरीभागात ठिक आहे परंतु ग्रामीण भागात ती पालकांची डोकेदुखी ठरत आहे.

याठिकाणी जवळजवळ सर्वजण मोलमजुरी व शेती कामात व्यस्त असतात. त्यामुळे पालकांना मुलांसाठी वेळ मिळत नाही. महागडा मोबाईल खरेदी करणे शेतमजुरांबरोबरच शेतकर्‍यांचीही ऐपत नाही.

ज्या १५-२० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल आहेत त्यांची मुलेही अभ्यासाव्यतिरिक्त व्हिडीओ गेम खेळण्यासाठीच मोबाईलचा अधिक वापर करत असल्याचे दिसून येत असून

त्यामुळे मोबाईलद्वारे शिक्षणाचे धडे ही सर्वच पालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीबद्दल पालक वर्गात नाराजी दिसून येत आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button