‘ह्या’ कारणामुळे झाला माजीमंत्री अनिल राठोड यांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, राठोड यांना आठ दिवसापूर्वी करोना झाला होता. त्यामुळे त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.

या उपचाराला ते चांगला प्रतिसादही देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः राठोड यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

राठोड यांना न्युमोनियाची लागणही झाली होती. त्यातून ते बरे होत होते. बरे वाटू लागल्याने त्यांनी हलका आहार घेण्यास सुरुवातही केली होती. मात्र आज पहाटे ६ वाजता त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

शहराच्या राजकारणावर प्रचंड दबदबा असलेल्या राठोड यांची नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती.त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती कळल्यावर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment