Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingMaharashtraPolitics

आमदार निलेश लंकेना अश्रू अनावर म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना….

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- माजी मंत्री आणि विद्यमान उपनेते अनिल रामकिसन राठोड (वय 70) यांचे आज बुधवारी पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले.

यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्व. राठोड यांना श्रध्दांजली वाहताना पारनेरचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार निलेश लंके यांना रडू कोसळले. राठोड यांच्या अंत्ययात्रेला नगरकरांनी मोठी गर्दी केली होती.

अंत्यसंस्कारानंतर स्थानिक नेत्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी  राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना त्यांच्याबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले.

यावेळी लंके म्हणाले, अनिलभैय्या राठोड हे आमचे सर्वांचे दैवत होते. ती एक आगळीवेगळी शक्ती होती. त्यांच्या जाण्यामुळे आम्ही नगरकर पोरके झालो आहोत.

नगर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला ताकद देण्याचे काम  त्यांनी केले. मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना त्यांचे आशीर्वाद मला होते.

दरम्यान राठोड यांच्या निधनाचे वृत्त सकाळी संपूर्ण जिल्ह्यात पसरले. त्यांच्यावर प्रेम करणारे शिवसेना, भाजप आणि इतर पक्षातील नेते, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाकडे धाव घेतली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांना समजाऊन सांगत गर्दी न करण्याचे आवाहन करत होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button