शेतकर्‍यांच्या खात्यात 1.40 कोटी जमा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- शेतकर्‍यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाकडून देशातील शेतकर्‍यांसाठी मागील वर्षापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात अनेक शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या होत्या.

या योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या होत्या.योजनेच्या लाभापासून वंचित शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून जवळपास सात हजार शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला असून शेतकर्‍यांच्या खात्यात 1.40 कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

या योजनेतून सरकारकडून शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. त्या पाठपुराव्यातून योजनेपासून वंचित असणार्‍या सात हजार शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत.

योजनेचे आजपर्यंत दोन टप्पे पार पडले असून लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात एकूण पाच हफ्त्यात आजपर्यंत 24 कोटी रुपये जमा झाले आहेत. अजूनही या योजनेचा लाभ मिळत नसलेल्या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे.

ज्या वंचित लाभार्थ्यांना पाच ह्फ्त्यांपैकी फक्त दोन हजार रुपयांचा एकच हफ्ता मिळाला त्या शेतकर्‍यांना अजून चार ह्फ्त्यांची रक्कम रुपये आठ हजार मिळावे व ज्या शेतकर्‍यांनी योजनेसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही काही शेतकरी अजूनही या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत

अशा शेतकर्‍यांना तातडीने या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पाठविलेल्या पत्रात केलेली आहे. या योजनेचे पहिला टप्पा मागील वर्षी पार असून मतदार संघातील अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते.

त्याबाबत शेतकर्‍यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या जनता दरबारामध्ये योजनेचा लाभ मिळत नसल्याची कैफियत आ. आशुतोष काळे यांच्यापुढे असंख्य शेतकर्‍यांनी मांडल्या होत्या.

त्याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे व कृषी विभागाला त्यांनी योजनेपासून वंचित असणार्‍या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी येत असलेल्या अडचणी जाणून घेत जातीने लक्ष घालून पाठपुरावा केला होता.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment