Ahmednagar NewsAhmednagar NorthCrime

विवाहितेवर जंगलात झाला बलात्कार नवऱ्याने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यातील अंभोळ गावच्या शिवारात असलेल्या जंगलात एक २० वर्षाची गरीब तरुणी शेळ्या चारत असताना तेथे येऊन आरोपी सचिन बाळू भवारी रा. अंभोळ ता. अकोले याने तू मला खूप आवडतेस, मला तुझ्यासोबत प्रेम संबंध करायचे आहेत.

तेव्हा मुलीने तू वेडा झाला का आपले नाते काय आहे, असे म्हणत त्याला विरोध केला. तेव्हा आरोपी सचिन भवारी याने तरुणीस जबरदस्ती करून खाली पडून इच्छेविरुध्द्व जबरी संभोग करत बलात्कार केला.

तु जर कोणाला काही सांगितले. तुझे लग्न मोडील, तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. सदर तरुणीने जून २०२० मध्ये लग्न झाले. १५ दिवसांनी तिला उलटी झाल्याने तिच्या पती व सासरच्या लोकांना संशय आला.

त्यांनी अकोल्याच्या डॉक्टरकडे नेवून तपासणी केली असता ती साडेचार महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले. नवर्‍याने पीडित पत्नीला लगेच घटस्फोट दिला.

हा प्रकार पिडीत तरुणीने घरच्यांना सांगितला तेव्हा तरुणीच्या फिर्यादीवरून नात्यातील आरोपी सचिन बाळू भवारी यांच्याविरूद्ध अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button