अहमदनगर ब्रेकिंग : महापालिकेची सर्व कार्यालये 14 दिवस बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- महापालिका कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत चालला आहे, ही साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेची सर्व कार्यालये 14 दिवस बंद ठेवून कर्मचार्‍यांना

 ’वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगून त्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्यात यावी, अशी मागणी महापालिका कामगार युनियनने आयुक्त व महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

मात्र आयुक्त निर्णय घेवो अगर न घेवो कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी युनियनच्यावतीने सोमवार (दि.10) पासून या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले.

याबाबत युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार व महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेवून निवेदन दिले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment