Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : विद्यार्थीनीला शेतात उचलून नेत बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यातील वाळुज येथे राहणार्‍या १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थितीस रात्रीच्या वेळी तोंड दाबुन उचलून शोतात नेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. 

विद्यार्थिनीचा आरडाओरड ऐकून तिची आई व आजी येत असल्याचे पाहून आरोपी अमोल गिते, रा. वाळुंज याने अत्याचार करुन पळून जातांना विद्यार्थिनीस म्हणाला की, जर पोलिसात तक्रार दिली तर तुला व तुझ्या आई-वडीलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

सदर घटना १ ऑगस्टच्या रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली काल पिडीत विद्यार्थिनीने पाथर्डी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी अमोल गिते याच्यावर भादवी कलम ३७६ (२) (आय) (३) सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button