श्रीगोंदा तालुक्यात आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील 80 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला.त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींची संख्या 4 झाली आहे.

येळपणे येथील 80 वर्षीय व्यक्ती इतर आजारांशी झुंजत होते. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.दरम्यान आज आत्तापर्यंत 110 व्यक्तींच्या तपासणीत एकूण 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यात हंगेवाडी येथील पाच व्यक्तींचा समावेश आहे. शहरातील काळकाई चौक येथे 3, कौठे,येळपणे, देवदैठण येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.सध्या तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीनशे पेक्षा जास्त झाली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment