फटाके फोडणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :-अयोध्या येथे राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. या जल्लोषात कोपरगाव येथे मुख्य रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या सात जणांविरोधात

यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यावर कोपरगाव शहर पोलिसात जमाव बंदी व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

जय मल्हार कॉम्प्लेक्स समोर विघ्नेश्वर चौक, येथे १२.४५ वाजण्याच्या सुमारास फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करताना आढळून आल्या प्रकरणी सत्येन सुभाष मुंदडा,

रविंद्र रामदास बारावके, सुशांत सुभाष खैरे, सोमनाथ जगन्नाथ आहिरे, कुणाल संतोष पवार, प्राजक्ता सुशांत खैरे, अमृता श्रीकांत खैरे या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment