Ahmednagar CityAhmednagar NewsMaharashtra

पारस ग्रुपचे चेअरमन माणकचंद बोथरा यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :-  भारतभरात नावाजलेले उद्योजक नगर येथील पारस (बोथरा) ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन माणकचंद बोथरा (वय ७९, ) यांचे मंगळवारी (४ जुलै) दुपारी खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराने निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ३ मुले, १ मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नगर येथील आनंदऋषिजी हॉस्पिटलच्या उभारणीत सुरवाती पासून आज पर्यन्त माणकचंद बोथरा यांचे मोठे योगदान आहे.

ते अत्यंत धार्मिक व दानशूर होते. उद्योजक पेमराज बोथरा, श्रावक संघाचे सेक्रेटरी व आनंदऋषिजी हॉस्पिटलचे ट्रस्टी संतोष बोथरा आणि उद्योजक सतीश बोथरा यांचे ते वडील होत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button