धक्कादायक : रक्षकच झाले भक्षक, धमकावून खंडणी उकळली…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत. हेच आपण ऐकत आलो आहोत. याचा वेळोवेळी प्रत्यय देखील येतो. परंतु कधी संरक्षकचं तुमचे भक्षक झाले तर ? असाच काहीसा प्रकार शिंगणापूर पोलिसांकडून घडला आहे.  
भाडोत्री पिकअप मधून नगरला धान्य विकण्यासाठी घेवून जात असताना शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या दोघा कर्मचार्‍यांनी रस्त्यात अडवून हे धान्य रेशनचे असल्याचे सिद्ध करु शकतो
ते महागात पडेल असे धमकावून ऐंशी हजाराची खंडणी उकळल्याचा तक्रार खरवंडी येथील महाविद्यालयीन युवकाने राज्याच्या गृह सचिवांकडे केली आहे.
दरम्यान याबाबत चौकशी करुन संबंधीत पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केली आहे.
याबाबत वैभव विलास उगले याने निवेदनात म्हटले की, मी वडिलांना किराणा दुकानात मदत करत असतो. लोक किराणा सामान खरेदीच्या बदल्यात धान्य, कडधान्य तेलबिया देत असतात.
या माध्यमातून जमा झालेले धान्य नगरच्या आडते व्यापार्‍याला विकून त्याची रोख रक्कम करायची असा पुर्वापार व्यवहार चालत आला आहे.
8 जुलै रोजी धान्य गोण्यांत भरुन भाडोत्री पिकअपद्वारे धान्य घेवून जात असताना शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांनी वाहन अडवून ते निर्जनस्थळी घेण्यास भाग पाडले.
तेथे कर्मचार्‍याने गाडीची चावी व मोबाईल हिसकावून घेतला व वडिलांना फोन करुन धमकावून खंडणी मागितली. त्यावर त्या पोलिसाला गुगल पे द्वारे 80 हजाराची रक्कम देण्यात आली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment