Ahmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingPolitics

सुजय म्हणतो, तसे करू नका म्हणून जिल्हाधिकार्यांना कोणी फोन करते काय ?

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नॅशनल हेल्थ मिशन निधी खर्चाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विश्वासात घेत नाहीत, सूचनांची दखल घेत नाही, त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, अशी भूमिका डॉ.विखे यांनी मांडली होती.

कोविड उपचार सुविधांसाठी अहमदनगर जिल्ह्याला आलेल्या 18 कोटी रुपयांच्या निधीतून होत असलेल्या कामांबाबत व खासदार म्हणून यात आपल्या सूचनांची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात नसल्याची तक्रार खासदार डॉ.सुजय विखे यांनी नॅशनल हेल्थ मिशन व केंद्रीय आरोग्य मंत्रालय अंतर्गत असलेल्या आरोग्य समितीकडे केली आहे.

माझ्या मनात जे काही होते ते मी केंद्रीय समितीसमोर मांडलेले आहे. समितीच्या बैठकीत काय झाले हे आम्हाला बाहेर सांगता येत नाही. परंतु मला जे काही सांगायचे आहे.

ते मी लेखी स्वरूपामध्ये सांगितलेले आहे. त्यावर भाष्य करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. विखे म्हणाले, जिल्हााधिकारी हे माझे मित्र आहेत. आमच्यात चांगला संवाद आहे.

माझ्याकडून काही माहिती त्यांनी घेतली परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. डॉक्टर म्हणून माझ्याकडून सर्व जाणून घेतले जाते. पण होत काहीच नाही. त्यामुळे सुजय म्हणतो, तसे करू नका म्हणून त्यांना कोणी फोन करते काय, याची शंका वाटते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button