ह्या शहरात ८ दिवस जनता कर्फ्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- नेवासे शहरातील कोरोना रुग्णाचा वाढती संख्या पाहता जनता कर्फ्यू करण्यासंदर्भात नगरसेवक, व्यापारी व नागरिकांच्या झालेल्या बैठकीत शनिवारी सायंकाळपासून आठ दिवसांचा शहरात जनता कर्फ्यू सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

नेवासे शहरात सुरू असलेल्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहर पुन्हा जनता कर्फ्यू करण्याची वेळ येऊ नये म्हणून शहरातील जनतेला नियम पाळण्याचे आवाहन काही नगरसेवकांनी सोशल मीडियाद्वारे केले होते.

त्यानंतर एक बैठक ही घेण्यात आली होती. मात्र, यातमध्ये दोन मत प्रवाह निर्माण झाले होते. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांत रुग्ण वाढत असल्याने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यासाठी गुरुवारी नगरपंचायत प्रांगणात व्यावसायिक,

नागरिक, राजकीय पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जनता कर्फ्यू करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यासह नगारिक, व्यावसायिक उपस्थित होते. दरम्यान, जनता कर्फ्यूसाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन नगर पंचायत प्रशासन व तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नेवा

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment