Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर ब्रेकिंग : मुख्याध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर पाच नवे रुग्ण आढळून आले. मृतांमध्ये ४९ वर्षे वयाचे मुख्याध्यापक, तसेच वृध्द महिलेचा समावेश आहे.

देवळाली प्रवरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासह कुटुंबातील तीन सदस्य, तर गुहा येथे ५० वर्षे वयाचा पुरुष बाधित आढळला.

राहुरी शहरात वास्तव्यास असलेले आरडगाव येथील खासगी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कोरोनाची बाधा झाल्याने मरण पावले.

ही घटना गुरुवारी पहाटे घडली. त्यांना नगर येथे नेण्यात आले होते. मात्र, उपचारांपूर्वी त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या कुटुंबीयांची स्वॅब तपासणी करण्यात

आली असून ते निगेटिव्ह आले आहेत. सोनगाव येथील वृध्द महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे राहुरी तालुक्यातील मृतांची एकूण संख्या तीन झाली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button