अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील एक 23 वर्षीय तरुण व बेलवंडी स्टेशन येथील एक 28 वर्षीय विवाहित महिला या दोघांनी एकमेकांना दोरीने बांधून घेऊन

कर्जत तालुक्यातील चखालेवाडी शिवारात एका विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे प्रेमसंबंधातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती कर्जत पोलिसांनी दिली आहे.

या प्रेमीयुगुलाने काल दि 5 रोजी सायंकाळी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली आज विहिरीच्या मालक असलेल्या शेतकऱ्याला शंका आल्यामुळे

त्याने याबाबत कर्जत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती समजली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment