नगरसेविकाच्या बहिनीचा कोरोनाने मृत्यु.!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-  अकोले शहरातील एका नगरसेविकेच्या बहिनीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयातून ही माहिती प्राप्त झाली आहे.

मात्र, हा मृत्यू कोरोनाच्या कागदावर आला असला तरी या महिलेस यापुर्वी बर्‍याचशा आजारांंनी ग्रासलेले होते. त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोनाचा हा चौथा बळी गेला असून आजवर 174 रुग्ण तालुक्यात मिळून आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,गेल्या दोन दिवसांपुर्वी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला असता त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.

मात्र, फार काळ त्या कोरोनाशी झुंज देऊ शकल्या नाही. दरम्यान सायंकाळी त्यांना जास्त त्रास होत असल्याची माहिती मिळाली होती. तर रात्री त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment