हत्यार बाळगणाऱ्या ‘त्या’ युवकावर गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- अहमदनगरमधील सारसनगर परिसरात एक १९ वर्षीय युवक मोठा चाकू स्वतःसोबत बाळगून फिरत असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी त्या युवकास ताब्यात घेतले.

करण ईश्वर कचरे (वय- 19 रा. सारसनगर, भिंगार) असे या युवकाचे नाव असून पोलीस हवालदार गोपीनाथ गोर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारसनगर परिसरात एक युवक एका बाजुने धार व एका बाजूने दातरे असलेला मोठा चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी सारसनगरमधील मदरसा परिसरात कानडे मळा जाणार्‍या रोडवर करण कचरे या युवकाला ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता एक चाकू मिळून आला.

पोलिसांनी तो जप्त केला आहे. याप्रकरणी कचरे याच्याविरूद्ध भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अजून या युवकाकडे काही हत्यारे आहे का? याचा तपास पोलीस हवालदार नगरे करीत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment