अहमदनगरसाठी खुशखबर ! विजेसंदर्भात महसूल मंत्री थोरातांच्या ‘ह्या’ महत्वपूर्ण सूचना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :सध्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता, जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. तसेच औद्योगिक वसाहतीदेखील आहेत. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात विजेची मागणी वाढती आहे.

हे लक्षात घेता उत्तर नगर जिल्ह्यात विजेचा वापर जास्त असल्याने 220 केव्ही व 132 केव्ही मेगा सबस्टेशन निर्मिती सोबत एमआयडीसीसाठी स्वतंत्र फिडर व शेतीसाठी अतिरिक्त फिडर उभारण्यात यावे, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वीज विभागाला केल्या.

नुकतीच त्यांनी उत्तर नगर व संगमनेरमधील विविध प्रश्नांबाबत ऊर्जा मंत्र्यांसह मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयात एक बैठक घेतली.

यात त्यांनी अनेक सूचना केल्या. * काय झाली चर्चा – यामध्ये खांबे 33 के.व्ही. सबस्टेशन टेंडर (महावितरण),एम.आय.डी.सी. स्वतंत्र एक्स्प्रेस फिडर करणे बाबत, एम.आय.डी.सी. सबस्टेशन 5 एम.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मर मागणी (महावितरण),

तळेगाव सबस्टेशन 5 एम.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मर मागणी (महावितरण), हिवरगाव पावसा सबस्टेशन 5 एम.व्ही.ए.(सध्या 3.15 एम.व्ही.ए.) ट्रान्सफॉर्मर मागणी (महावितरण), देवगाव, पिंपरणे, खळी व निंबाळे सबस्टेशनला 5 एम.व्ही.ए. अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मागणी (महावितरण), पारेगाव खुर्द 33 के.व्ही. सबस्टेशन मंजुरी (महावितरण),

खिरविरे अकोले 33 के.व्ही. सबस्टेशन मंजुरी (महावितरण), देवठाण अकोले 33 के.व्ही. सबस्टेशन मंजुरी (महावितरण), ओव्हर लोड प्रस्तावास मंजुरी देणे, मेंढवण 132 के.व्ही. सबस्टेशन मंजुरी (महापारेषण),

सायखिंडी 220 के.व्ही. सबस्टेशन मंजुरी (महापारेषण) या प्रश्नांबाबत चर्चा झाली. याबैठकीस महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, संचालक संचलनालय दिनेश साबू, महावितरणचे संचालक खंडाईत, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता सांगळे आदींनी व्हिडीओ कॉन्फरंन्सद्वारे सहभाग घेतला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment