महत्वाची बातमी : या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण

Published on -

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- नगर-सोलापूर या राष्ट्रीयमहामार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. या संदर्भात भूसंपादन निवाड्याचे काम पूर्ण झाले आहे. नगर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांचे मार्फत नोव्हेंबर पावेतो प्रकल्प प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वहातुक मंत्र्याच्या दरबारी दाखल होणे अपेक्षित आहे.

त्यापुढे राष्ट्रीय महामार्ग समितीची मान्यता मिळाल्यानंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीस या रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या उपस्थितीत आमदार रोहित पवार यांनी नियोजन भवनात बैठक घेत आढावा घेतला.

शुक्रवारी नगर-सोलापूर महामार्गाच्या संदर्भात प्रदीर्घ बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय माहामार्गचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, भूसंपादन अधिकारी शाहुराज मोरे, नगर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, श्रीगोंदा प्रांताधिकारी सुधाकर भोसले, कर्जत प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्यासह महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!