रोहित पवारांच्या मतदारसंघातील ‘ह्या’ भागात जनता कर्फ्यू जाहीर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघातील जामखेड शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे आज पासून पुढील चार दिवस म्हणजेच 12 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. 

यामध्ये अत्यावश्यक सेवा दूध, भाजीपाला, पाणी, दवाखाने आणि मेडिकल चालू राहतील असा निर्णय तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी व्यापारी व विविध संघटनेच्या बैठकीत घेतला आहे.

तहसील कार्यालयात व्यापारी, लघु व मोठे व्यावसायिक यांच्या उपस्थितीत तहसीलदार नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीला मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, कामगार तलाठी सुखदेव कारंडे उपस्थित होते.

मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी बोलताना सांगितले की, करोना साखळी तोडण्यासाठी 14 दिवस लॉकडाऊन असणे गरजेचे आहे पण ते सध्या शक्य नाही तसेच याबाबत सर्वांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे. यापुढील काळात दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्याची ग्वाही दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment