Ahmednagar NewsAhmednagar SouthCrime

धक्कादायक! ‘त्या’ दोघांनी केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील माणिक दौंडी येथे एका पुरुषाने व महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

इंद्रजित वाल्मिक इंगळे (वय- 35 रा. शिरोडा ता. कन्नड जि. औरंगाबाद), रेखा सानप (वय- 30 रा. पैठण जि. औरंगाबाद) असे मृतांची नावे आहेत.

सदर मयत महिला मयत इंद्रजित याचा घरमालक बाळासाहेब सानप याची पत्नी असल्याचे पोलीस तपासात समोर आले. माणिक दौंडी

येथील रोडच्या कडेला एका हॉटेलजवळ एक दुचाकी (क्र. एमएच- 15 जीटी- 4027) उभी असून दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती माणिक दौंडीच्या सरपंचानी पाथर्डी पोलिसांना दिली.

मयत पुरूषाच्या खिशात पाकीट व ओळख पत्रावरून तो इंद्रजित इंगळे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी इंद्रजित याचे वडील वाल्मिक इंगळे यांना आत्महत्येची माहिती दिली.

आत्महत्या केलेल्या महिले विषयी वाल्मिक इंगळे यांच्याकडे चौकशी केली असता, ती माझी सून नसल्याचे वाल्मिक यांनी पोलिसांना सांगितले. या दोघांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा तपास पाथर्डी पोलीस करीत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button