कोरोनाच्या आकडेवारीबाबत ‘ह्या’ आमदारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने 

योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. 

मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही वाढणारी संख्या चिंताजनक आहे. यापुढे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांवर एस. एस. जी. एम. महाविद्यालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये यशस्वी उपचार केले जात आहेत.

परंतु तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्येमुळे आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण पडत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता या बाधित रुग्णांना आत्मा मलिक वसतिगृहात उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भविष्यात अशीच वाढ होत राहिली तर निश्चितपणे उपचार करण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण होणार असला तरी भविष्यात शिर्डी येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात येईल.

मात्र अशी वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घेऊन कोरोनाचा वाढत असलेला प्रसार रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,नागरिकांनी नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आ. काळे यांनी केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कोपरगाव येथील कोरोना सेंटर वाढत्या रूग्णांना सेवा देण्यास अपुरे पडत आहे. त्यामुळे  रूग्णांची हेळसांड होत आहे.

त्यामुळे या रूग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा असा इशारा देत शिर्डी येथे तातडीने कोरोना सेंटर उभारावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी केली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment