सुशांत प्रकरणात राजकारण करून काय मिळणार आहे ? – आमदार रोहित पवार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करा. तसेच महाविकासआघाडी सरकार पोलिसांवर दबाव टाकून पुरावे नष्ट करीत आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून सातत्याने होत आहेत. यावर नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीच्या निमित्ताने आ. रोहित पवार हे आले होते. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला. 

‘भाजपला या प्रकरणात राजकारण करून काय मिळणार आहे ? असा प्रश्न उपस्थित करताना उगाच ते पोलिसांवर आक्षेप घेतात. गेल्या पाच वर्षापासून ज्या पोलिसांचे भाजपने संरक्षण घेतले, त्याच पोलिसांवर आम्ही विश्वास ठेवला. सरकार बदलले म्हणजे पोलिसांवर आपण आक्षेप घेतलाच पाहिजे असे नसते.

त्यामुळे यात राजकारण न करता सुशांतला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,’ असा सल्लाही त्यांनी भाजप नेत्यांना दिला. भाजपचा सोशल मीडिया सक्षम आहे. या मीडियावर एखादा ट्रेंड चालवणे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जमते. भाजपचे नेते शब्दात खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. आज सुशांतसिंह राजपूत प्रकरणात तेच चालू आहे, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली.

भाजपकडे जर या प्रकरणातील पुरावे असतील, तर त्यांनी ते महाराष्ट्र सरकार व पोलिसांना द्यावेत. पुरावे नसताना ते गंभीर आणि मोठी वक्तव्ये करत असतील, तर ते राजकारण करीत आहेत, हे माझ्यासारख्याच काय तर सर्वसामान्य नागरिकांनाही कळतं,’ असा टोलाही त्यांनी लगावला. अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची हत्या झाल्याचं तुम्ही म्हणता आणि पुरावेही देत नाही.

तुमचे पुरावे तुमच्याकडेच ठेवता. मग सुशांतसिंह प्रकरणात तुम्हीच पुरावे दाबत आहात असं म्हणायचं का?, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला झापले. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे असंही म्हणता आणि पुरावेही देत नाही, हा काय प्रकार आहे, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, राज्य सरकारकडे काही लपवण्यासारखं नसेल तर सीबीआय चौकशीला परवानगी का दिली जात नव्हती? सत्य बाहेर आलंच पाहिजे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळं राज्य सरकारनं सीबीआय चौकशीची मागणी मान्य करण्यास हरकत नव्हती. अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजच केली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment