‘ह्या’ गावात दोन ट्रक चालक कोरोना बाधित , गाव तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे दोन ट्रक चालक कोरोना बाधित आढळून आले. यामुळे गावात तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले अाहे, अशी माहिती सरपंच अमोल वाघ यांनी दिली.

सरपंच वाघ म्हणाले, जवखेडे येथील एका चालकाला कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे त्याचे स्राव नमुना तपासणीसाठी देण्यात आले.

त्यानंतर त्याच्या स्रावाचा अहवाल येण्या अगोदरच त्याला जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चालकाचा पाथर्डी येथे स्त्राव नमुना घेण्यात आला.

त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आल्यानंतर तो घरी येऊन गावातील लोकांच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याचा गुरुवारी दुपारी

जिल्हा रुग्णालयाकडील तपासणी अहवाल पॉझीटीव्ह असल्याचे समजल्याने प्रशासनाच्या या तांत्रिक बाबीमुळे रुग्णांसह त्याच्या नातेवाईकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment