धक्कादायक! कचरा टाकल्याने अंत्यविधीस जाण्याचा मार्ग झाला बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या ठेकेदाराने अंत्यविधीस जाण्याच्या मार्गावर कचर्‍याचे ढीग व मृत जनावरे टाकून रस्ता बंद केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या प्रश्नासंदर्भात विविध सामाजिक संघटनानी आक्रमक होत आंदोलन करून आरोग्य विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

दरम्यान, राहुरी कारखाना ठिय्या आंदोलनाच्या घटनास्थळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी आंदोलनकर्त्यांना येथील सर्व कचरा उचलण्याचे आश्वासन दिले.

नगरपालिकेसह आरोग्य ठेकेदाराची चूक मान्य करीत आरोग्य विभाग प्रमुखास नोटीस काढून तसेच संबंधित आरोग्य ठेकेदाराविरुद्ध दंड आकारणीची कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

राहुरी कारखाना येथे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जागेत असलेल्या अमरधामच्या रस्त्यावर नगरपालिकेच्या आरोग्य ठेकेदाराने राहुरी कारखाना परिसरातील गोळा केलेला कचरा,

मृत जनावरे व नगरपालिकेमार्फत ठराविक फी घेऊन उपसण्यात आलेला मैला अमरधाम रस्त्यावरील विसाव्याच्या ठिकाणी टाकून अमरधामकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करून

मृत आत्म्याच्या शेवटच्या प्रवासालाही आरोग्य ठेकेदाराने आडकाठी निर्माण केली आहे. सत्ताधारी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी समक्ष पाहणी करून सामाजिक संघटना व अंबिकानगर, कामगार वसाहत या भागातील दत्तात्रय साळुंके,

प्रशांत काळे आदी कार्यकर्त्यांना एकत्र जमवून घटनेची माहिती दिली. त्याचवेळी सर्वांनी अमरधाम रस्त्यावरील घाणीच्या साम्राज्यात ठिय्या आंदोलन सुरू केले.

दरम्यान या आंदोलनाची माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम व मुख्याधिकारी अजित निकत यांना आंदोलनकर्त्यांनी दिली. काही वेळातच मुख्याधिकारी अजित निकत घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी तातडीने आरोग्य विभागाला जेसीबी, टेम्पो आदी साधन सामुग्री उपस्थित करून कचर्‍याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन याठिकाणी लावण्याचे आदेश दिले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment