दोघांनी एकमेकांना मिठी मारत,पाण्यामध्ये उडी घेतली आणि या अनोख्या प्रेमाची गोष्ट…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- प्रेमाला वय नसत, विचार नसतात असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील एका घटनेने दिला.

याठिकाणी 23 वर्षीय युवक आणि 30 वर्षांची विवाहीत महिला यांनी त्यांच्या या अनोख्या प्रेमासाठी कुटुंबीयांमधून होत असलेला विरोध पाहून स्वतःचा ‘करुण’ अंत करून घेतला.

या घटनेमुळे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी: मढेवडगाव येथील युवक हा बेलवंडी स्टेशन परिसरामध्ये त्याच्या मावशीकडे जात असे.

मावशीच्या शेजारी राहत असलेल्या 30 वर्षीय विवाहित महिला या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. परंतु या सर्व गोष्टीस घरून विरोध होऊ लागला. त्यांनतर हा युवक 5 ऑगस्ट रोजी तो युवक मित्राची गाडी घेऊन बेलवंडी येथे आला.

त्यानंतर ते चखलेवाडी शिवारात आले. दुसर्‍या दिवशी या दोघांनी स्वतःचे हातपाय एकत्र बांधत एकमेकांना मिठी मारली व विहिरीमध्ये उडी घेतली. त्यानंतर हे लक्षात येताच लालासाहेब पवार यांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment