Ahmednagar CityAhmednagar NewsBreaking

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत अत्यंत महत्वाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची विनंती बदल्या करण्यास सांगितले असले तरी आदिवासी भागातील (पेसा) शिक्षकांच्या बदल्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पेसाच्या बदल्या होणार नसल्याने बदलीची प्रक्रियाच पूर्ण होणार नाही. यामुळे यंदा अहमदनगर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यावर गंडांतर येणार आहे.

राज्य सरकारच्या आदेशानूसार यंदा प्राथमिक शिक्षकांच्या 10 ऑगस्टपर्यंत विनंती बदल्याचे करण्याचे सुधारित आदेश होते. मात्र, जिल्हा परिषदेतील वाढता करोना संसर्ग

यामुळे विनंती बदल्यांसाठी राबविण्यात येणारी प्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही. यामुळे पेसा भागातील बदल्या बाजूला ठेवून उर्वरित जिल्ह्यातील बदली प्रक्रिया राबवायाची ठरल्यास ती देखील होण्याची चिन्हे कमी आहेत.

अद्याप शिक्षण विभागाने विनंती बदलीसाठी जिल्ह्यातून शिक्षकांची नावे जमा केलेली नाही. यामुळे शिक्षकांच्या बदल्यांचा 10 ऑगस्टचा मुर्हूत तुर्तास टळणार आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button