‘त्या’ शेतकऱ्याच्या कुटुंबास १ लाखाची मदत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास जिल्हा प्रशासनाकडून १ लाखाची मदत देण्यात आली.

मृत शेतकरी दादा भाऊ शिंदे यांच्या पत्नी कुसुम शिंदे यांना शासनाकडून मिळणाऱ्या १ लाख रुपये मदतीचा धनादेश तहसीलदार उमेश पाटील आणि निवासी नायब तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

दशमीगव्हाण येथील शेतकरी दादा शिंदे यांनी झाडास गळफास घेऊन आत्महत्या केयाची घटना २८ मे २०२० रोजी उघडकीस आली होती.

कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी व शेती व्यवसायावरील संकटाने हतबल होऊन त्यातून ही आत्महत्या झाली असावी, अशी गावात चर्चा होती.

त्यांच्या कडे एका बँकेचे व सहकारी संस्थेचे मिळुन सहा लाख रूपये कर्ज होते. या कर्जापायी त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

त्यांच्या परिवाराला शासकीय मदत मिळण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तालुकास्तरीय समितीने संपूर्ण चौकशी करून जिल्हास्तरीय समितीकडे शिफारस केली.

त्यानंतर जिल्हास्तरीय समितीनेही त्यास मंजुरी दिल्यानंतर शासनातर्फे १ लाख रुपये मदतीचा धनादेश मृत शेतकरी दादा भाऊ शिंदे यांच्या पत्नी कुसुम दादा शिंदे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment