राहुरी तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी आढळले ‘इतके’ काेरोना बाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी रॅपिड अँटीजेन चाचणीत २२ जण बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली.

यामध्ये टाकळीमिया येथे ८, राहुरी फॅक्टरी येथे ३, देवळाली प्रवरा २, गुहा २ रुग्ण, देसवंडी १, बारागाव नांदूर ३, पाथरे खुर्द १, राहुरी शहर २ जणांचा समावेश आहे.

शनिवारी दुपारपर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा तालुक्यातील आकडा १४४ पर्यंत जावून पोहाेचला. त्यापैकी ८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून तिघांचा मृत्यू झाला.

५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अातापर्यंत तिघांचा मृत्यू झाला, तर २३ रुग्णांवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, ६ रुग्णांवर विवेकानंद नर्सिंग होम राहुरी फॅक्टरी,

नगर सिव्हीलला १० रुग्णांवर व खासगी दवाखान्यात १३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment