श्रीरामपुरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू; ११ बाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीवर राहणाऱ्या कोरोना बाधित असलेल्या एकाचा उपचार सुरू असताना शुक्रवारी नगर येथे मृत्यू झाला. शनिवारी घेण्यात आलेल्या तपासणीत श्रीरामपूर तालुक्यातून ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ३९५ वर पोहोचली. १० बधितांचा मृत्यू झाला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये ७० जणांची तपासण्या करण्यात आली असून

यात ११ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील बाधितांची संख्या ३९५ वर गेली. यामध्ये कारागृहातील ५, मोरगे वस्ती येथील २, पढेगाव, दत्तनगर व बेलापूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

आंबेडकर वसतिगृहातील कोरोना केंद्रात ७० टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ५९ अहवाल हे निगेटीव्ह आले. सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment