धक्कादायक! महत्वाच्या दस्ताऐवजमध्ये नगरसेवकाने केले असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  जनसामान्यांना त्यांचे अधिकार आणि अनेक सुविधा मिळण्याचे महत्वपूर्ण दस्ताऐवज म्हणजे रेशनकार्ड. परंतु संगमनेरमधील एका नगरसेवकाने याच दस्ताऐवजमध्ये अकायदेशीर असे काम केले आहे.

तहसीलदार किंवा पुरवठा अधिकारी यांच्या सहीने दिलेले दिले जाणारे रेशनकार्ड या नगरसेवकाने स्वत:च सही शिक्के मारून वितरीत करण्याचा प्रताप केला आहे.

काँग्रेसचे नगरसेवक किशोर बद्रीनाथ टोकरी यांनी असे कृत्य केले आहे. याविषयी माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी तहसिलदारांकडे तक्रार केली असून तालुका दंडाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

रेशनकार्डच्या बाबतीत अनेकदा गैरप्रकार होत असतात. पुरवठा अधिकाऱ्यांचे बनावट सही शिक्के वापरून बोगस रेशनकार्ड केले जाण्याचे प्रकारही अनेकदा उघड होत असतात.

प्रकार उघडकीस आल्यावर अशी कार्ड रद्द केली जातात. तरीही हे प्रकार थांबत नाहीत. संगमनेरमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी आणि नगरसेवक असे दोन्ही शिक्के यावर मारल्याचे दिसून येत आहे.

नगरसेवकाला अशी रेशनकार्ड वितरित करण्याचा आधिकार नाही तसाच तो विशेष कार्यकारी अधिकाऱ्यालाही नाही. वाकचौरे यांनी सांगितले की,

आमच्याकडे आलेल्या काही प्रकरणात या नगरसेवकाने रेशनकार्डवर स्वत:चे सही शिक्के मारल्याचे आढळून आले. असे किती कार्डचे वितरण झाले आहे,

त्यांनी काय काय फायदे घेतले. ते खरे आहेत का, याची माहिती सांगणे अवघड आहे. त्यामुळे कारवाईची मागणी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment