Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ४१ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६६४७ झाली आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.०८ टक्के इतकी आहे.

दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३००९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१,, नगर ग्रामीण ०७, कँटोन्मेंट ०४, पारनेर ०५, जामखेड ०१ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०३अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ३९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १९५, संगमनेर २९ राहाता ४, पाथर्डी ४, नगर ग्रा.११ श्रीरामपूर १,

कॅन्टोन्मेंट ३, नेवासा ११, श्रीगोंदा २०, पारनेर ३६, अकोले १४, शेवगाव २९, कोपरगाव २६, जामखेड ६, कर्जत ०६, मिलिटरी हॉस्पीटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेले एकूण रुग्ण:६६४७
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३००९
  • मृत्यू: १०८
  • एकूण रूग्ण संख्या:९७६४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button