Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingPolitics

जिल्हाधिकारी व्दिवेदींनी दुजाभाव केला ; भाजपकडून धिक्कार

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोरोनामुळे अहमदनगरमध्ये सर्वच दुकानांची वेळ ठरलेली आहे. परंतु ही वेळ २ तासांनी वाढवावी असे निवेदन देण्यासाठी भाजप पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते.

परंतु कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ते निवेदन हातात घेण्यास नकार दिला. मात्र या पदाधिकारी समोरच त्यांनी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून शिवसेनेचे निवेदन स्वीकारले.

त्यामुळे जिल्हाधिकारी हे दुजाभाव करत आहेत आणि भाजप असल्या अधिकाऱ्यांचा धिक्कार करतो असे संतापजनक वक्तव्य भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांनी केले.

तसेच याची तक्रार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात नगर शहरातील व्यापाऱ्यांना दुकान बंद करण्याची वेळ दोन तास वाढवून देण्यात यावी,

अशा मागणीसाठी भाजप व्यापारी आघाडीकडून निवेदन देण्यासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे हे व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह आले होते.

मात्र हे निवेदन कोविड मुळे प्रत्यक्ष हातामध्ये स्वीकारण्यास जिल्हाधिकारी यांनी नकार दिल्याचा दावा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी केला आहे.

तर, दुसरीकडे मात्र शिवसेनेचे एक निवेदन भाजपच्या पदाधिकाऱ्यां समोरच खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्यानंतर ते जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले.

त्यामुळे मात्र भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांचा चांगला संताप झाला. जिल्हाधिकारी हे दुजाभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button