आमच्याविरूध्द बातम्या छापतो का? तुझे हात-पाय तोडू पत्रकाराला धमकी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील पत्रकार भरत थोरात यांना शनिवारी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणपत सखाहरी पवार याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

थोरात हे हाॅटेलमध्ये चहा पिऊन जात असताना पवार याने आमच्याविरूध्द वाळूच्या बातम्या छापतो का? तुझे हात-पाय तोडू. तू बेलापूर व श्रीरामपूरला ये, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.

थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला, मात्र तो सापडला आलेला नाही. तपास हेड काॅन्स्टेबल रामेश्वर ढोकणे करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment