Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingPolitics

आमदार नीलेश लंके यांचे केके रेंज बद्दल महत्वाचे वक्तव्य म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-खारे कर्जुने लष्करी सराव क्षेत्रासाठी प्रस्तावित वडगाव सावताळ, गाजीपूर, पळशी या गावांची लष्करी अधिकाऱ्यांनी पहाणी केल्याने ग्रामस्थांत अस्वस्थता आहे.

या तीन गावांसह ढवळपुरी व वनकुटे येथील जमीनही लष्करी सराव क्षेत्रासाठी अधिग्रहित होणार अशी चर्चा आहे. पारनेर तालुक्यातील या पाच गावांसह नगर तालुक्यातील सहा व राहुरी तालुक्यातील १२ गावांतील ग्रामस्थांच्या डोक्यावर लष्करी सराव क्षेत्राची टांगती तलवार कायम आहे.

रविवारी वडगाव सावताळ, गाजीपूर, पळशीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. याबाबत नागरिकांना, ग्रामपंचायतींना पूर्वसूचना नव्हती. सरपंचांनी विचारणा केली असता कुठलीही माहिती देण्यात आली नाही.यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार नीलेश लंके याच्या उपस्थितीत सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती वनकुट्याचे सरपंच राहुल झावरे यांनी दिली.

वनकुटे, पळशी, वडगाव सावताळ, गाजदीपूर, ढवळपुरीसह नगर तालुक्यातील इस्लामपूर, सुजानपूर, नांदगाव, शिंगवे, घानेगाव, देहरे, राहुरी तालुक्यातील बारागावनांदूर, चिंचाळे, बाभूळगाव, ताहाराबाद, वरवंडी, घोरपडवाडी, जांभूळबन, गाडकवाडी,

कुरणवाडी, दरडगावथडी, जांभळी, वावरथ, गडधे आखाडा व चिंचाळे या गावांचा समावेश अधिग्रहित करण्यात येणाऱ्या प्रस्तावित क्षेत्रात आहे.एक इंचही जागा केके रेंजला जाऊ देणार नाही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती.

संबंधित गावांचे ग्रामसभेचे ठराव दिलेले आहेत. कोरोना संसर्गामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट झाली नाही. परिसरातील शेतकऱ्यांची एक इंचही जागा केके रेंजसाठी जाऊ देणार नाही. प्रसंगी मोठे आंदोलन उभारण्यात येईल – आमदार नीलेश लंके

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button