आश्वासने देऊन खासदार आमदार व मंञी झालेल्या पुढा-यांना निवडणुकीनंतर विसर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- के. रेंजसाठी राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील जमिनीचे भूसंपादन होऊ दिले जाणार नाही. तसेच रेडझोन उठवला जाईल हे निवडणुकीत आश्वासने देऊन खासदार आमदार व मंञी झालेल्या पुढा-यांना निवडणुकीनंतर विसर पडला आहे,

अशी संतप्त भावना राहुरी तालुक्यातील वरवंडी बाभुळगाव,वावरथ, जांभळी, जांभूळबन,गडदेआखाडा सह इतर १३ गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लष्कराच्या सरावासाठी भूसंपादन केली जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या पैलतिरी असलेल्या जमिनीची पाहणी मिलिट्रीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू झाल्याने

या भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आठवडेभरापासून रोजच अधिकारी व जवानांची वाहने कुरणवाडी, वावरथ,जांभळी या भागात फिरत असल्याने मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बागायत जमिनीचे संपादन होणार? हा सवाल शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेचा बनला आहे.

या संकटातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नारायण तमनर, अण्णा सोडनर,रामदास बाचकर, अण्णा खिलारी यांच्या उपस्थितीत तालुक्यातील चिंचाळे येथे शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यात मार्गदर्शन करताना बारागाव नांदुर गटाचे जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे म्हणाले, जिल्हा परिषद गट माझ्या कुटुंबा प्रमाणे असल्याने येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे ही माझी जबाबदारी आहे. के. के. रेंजसाठी मुळा धरणाच्या लगत असलेल्या जांभुळबन,

वावरथ, जांभळी व इतर गावातील बागायती जमिनी संपादित करणे हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे.मुळा धरण स्थापना होण्यापूर्वी या भागातील परिस्थिती जिरायत होती. शेतकऱ्यांनी खडकाळ जमिनीवर मातीचे थर टाकुन जमिनी बागायत केल्या आहेत.

के. के. रेंजसाठी या भागातील जमिनीचा ताबा कुठल्याही परस्थितीत लष्काराला घेऊ दिला जाणार नाही.या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन देशाचे नेते शरद पवार यांची लवकरच भेट घेतली जाईल, असे आश्वासन गाडे यांनी दिले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment