व्यापार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू : कांदा लिलाव ‘या’ तारखेपर्यंत बंद !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा १० हजारांच्या पार गेला आहे. परंतु यात अहमदनगर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू पाहत आहे. 

शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. आता या कोरोनाची लागण होऊन अहमदनगरच्या बाजार समितीतील व्यापार्‍याचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापार्‍यांनी 15 ऑगस्टपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तसे निवेदनही नगर भाजीपाला, फळफळावळ आडते असोसिएशनच्यावतीने दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांना दिले आहेत. नगर बाजार समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आडते, व्यापारी व कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

यापूर्वीच काही संचालकांसह, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, आडत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही साखळी तोडने गरजेचे आहे. यासाठी काही काळ हा परिसर बंद राहिल्यास ही साखळी तुटू शकते.

याच पार्श्वभूमीवर नेप्ती बाजार समितीतील कांदा लिलाव सोमवार 10 ते 15 ऑगस्ट 2020 पर्यंत बंद ठेवून नेप्ती उपबाजार समितीत औषध फवारणी करावी. घनकचरा उचलण्याची व्यवस्था करावी. सोमवार 17 ऑगस्टपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरु करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment