24 तासांत 544 पॉझिटिव्ह व पाच जणांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ६२६ झाली. त्यातील ७ हजार २६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, मंगळवारी नगर शहर व जिल्ह्यातील आणखी पाच जणांचा मृत्यू झाला.

२४ तासांत ५४४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्हा रुग्णालयात ९३, अँटीजेन चाचणीत १७१ आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये २८० बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील ३८, नगर ग्रामीण २५, कँटोन्मेंट २, पारनेर १८, अकोले ५, कोपरगाव २, कर्जत १ आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील २ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत १७१ बाधित आढळले. यामध्ये संगमनेर १८, राहाता २७, पाथर्डी २९, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर २१, कॅन्टोन्मेंट १, श्रीगोंदे १८, पारनेर १, राहुरी ११, शेवगाव ९, कोपरगाव ७, जामखेड ७ आणि कर्जत २१ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा २३८, संगमनेर ६, राहाता ५, नगर ग्रामीण १६, कॅन्टोन्मेंट २, नेवासे १, पारनेर ४, अकोले १, राहुरी १, शेवगाव २, कोपरगाव १, जामखेड १ आणि कर्जतच्या २ रुग्णांचा समावेश आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment