कोरोनाच्या कहरामुळे मंत्री संतापले मग स्वतः एसपी रस्त्यावर उतरले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

तालुक्यातील कोरोना बाधितांनी हजारी पार केली आहे. असे असतानाही प्रशासन गंभीरपणे पावले उचलत नसल्याच्या तक्रारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नागरिकांनी केल्या होत्या.

या तक्रारीची गंभीर दखल घेत थोरात यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना बऱ्याचशा सूचना केल्या अन पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. काल जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह हे फौजफाट्यासह संगमनेरात दाखल झाले.

श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे व इतर अधिकारीही संगमनेरात आले. पोलिसांनी शहरातील नवघरगल्ली, बसस्थानक व इतर प्रमुख ठिकाणी भेटी दिल्या. रस्त्यावर उतरत एसपींनी नागरिकांना सूचना केल्या.

नियमांचे उल्लंघन करणार्‍या काही नागरिकांवर दंडाची कारवाई करण्यात आली. शहरातील एक प्रतिष्ठित वकील, राजकीय पदाधिकार्‍यांचे खाजगी सचिव व इतर प्रतिष्ठितांनाही या कारवाईला सामोरे जावे लागले.

दररोज पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असतानाही स्थानिक प्रशासन फारशा गंभीरतेने याकडे पहात नाहीत. मास्क न वापरता फिरणे,

सोशल डिस्टन्सिंग न पाळणे असे प्रकार शहरात सर्रास घडत असल्याच्या तक्रारी महसूल मंत्र्यांकडे केल्यानंतर मंत्री थोरात यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना संगमनेरात लक्ष घालण्याची सूचना केली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment