शेतकऱ्यांसाठी ‘असे’ धोरण जाहीर करणारा ‘विखे’ कारखाना राज्यात पहिलाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- कधी उसाची टंचाई तर कधी अतिरिक्त ऊस अशा संकटांमुळे साखर कारखाने नेहमीच संकटात सापडत असतात. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीतही होते. उसाची तोडणी कधी करायची हे कारखाना ठरवीत असल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी तो दरवर्षी चिंतेचा विषय असतो.

मात्र प्रवरानगर ‘विखे’ पाटील सहकारी साखर कारखान्याने येत्या ऊस गळीत हंगामासाठी पीक प्रकारानुसार ऊस तोडणीचा कार्यक्रम आखला आहे. हे नियोजन धोरण कारखान्याने गळीत हंगामापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची बरीचशी चिंता दूर होणार आहे.

विशेष म्हणजे अशाप्रकारचे नियोजन धोरण म्हणून जाहीर करणारा ‘विखे’ पाटील हा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष असलेल्या प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय नुकताच जाहीर केला.

या निर्णयाचा शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी घेतलेल्या धोरणाचे परिपत्रक प्रसिद्ध करून ते ऊस उत्पादकांना वितरित करण्यात येत आहे. या परिपत्रकानुसार, 2020-21 ऊस गळीत हंगामामध्ये पीक प्रकार व पक्वतेनुसार ऊस तोडणी कधी होईल

हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ऊस तोडणी पुढील नियोजनानुसार होणार आहे. – जून,जुलै,ऑगस्ट महिन्यात लागवड झालेले आडसाली ऊस – नोव्हेंबर महिन्यात तोडणी, सप्टेंबर महिन्यात लागवड झालेले आडसाली ऊस- डिसेंबर महिन्यात तोडणी,

ऑक्टोबर महिन्यातील सुरू व नोव्हेंबर महिन्यातील खोडवा- डिसेंबरमध्ये तोडणी, नोव्हेंबर मधील सुरू व डिसेंबर मधील खोडवा-डिसेंबर व जानेवारी महिन्यात तोडणी, डिसेंबर महिन्यातील सुरू व जानेवारीतील खोडवा – जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तोडणी, जानेवारीतील सुरू व फेब्रुवारीतील खोडवा- फेब्रुवारी व मार्च महिन्यात तोडणी ,

फेब्रुवारीतील सुरू व मार्च मधील खोडवा- मार्च व एप्रिल मध्ये तोडणी, मार्च मधील सुरू व एप्रिल मधील खोडवा- एप्रिल मध्ये तोडणी, एप्रिल व मे महिन्यातील सुरू एप्रिल महिन्यात तोडणी करण्यात येणार आहे.

उसाच्या पीक प्रकारानुसार उसाची तोडणी 11 महिने ते 17 महिने असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. साधारणपणे 1 नोव्हेंबरला कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होईल आणि 30 एप्रिलला गाळप सांगता होईल असे नियोजन यामध्ये आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment