अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा नवीन वाघ आला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- शिवसेना नेत्यांना आणि कार्यकत्यांना वाघ म्हणायची स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून परंपरा आहे. शिवसेना स्टाईल आंदोनल किंवा उत्तर म्हटलं तरी प्रत्येकाला ओळख आहे.

त्यामुळे शिवसैनिकांना `वाघ` ही बिरुदावली शोभून दिसते. नगरमध्ये नुकतीच एका वाघाने एक्झिट घेतली होती. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शिवसैनिक अस्वस्थ होते.

मात्र, अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्याचे चित्र बदलले आहे. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ ही घोषणा नामदार गडाखांच्या रूपाने घुमणार आहे.

मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेल्या गडाखांनी मागील निवडणुकीतच राष्ट्रवादी सोडून क्रांतिकारी शेतकरी पक्ष स्थापन केला. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या आमदाराचा पराभव केला.

२०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्याने ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपचा उमेदवार समोर असल्याने सोशल मीडियावरून प्रचारावरही भर दिला होता.

त्यावेळी त्यांच्या नावाचा समावेश असलेले ‘भोळ्या शंकरा’ हे भक्तिगीत मोठ्या प्रमाणावर गाजले होते. त्यांच्या प्रचारात, मोबाईल रिंग टोनमध्ये या गाण्याचा वापर करण्यात येत होता.

आता गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेवासा मतदारसंघात विशेषत: सोनई परिसरात वातावरण शिवसेनामय झाले आहे.

आतापर्यंत त्यांच्या विरोधात भूमिका घेतली, त्या जुन्या शिवसैनिकांच्या गळी नवे नेतृत्व उतरविणे, त्यांना सोबत घेऊन चालण्याचे आव्हान गडाखांसोबत आहे. त्यामुळेच शिवसेना स्टाइलने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे.

त्यांचे कार्यकर्ते, समर्थक एकमेकांना भेटल्यानंतर जाणीवपूर्वक ‘जय महाराष्ट्र’ म्हणत आहेत. फोनवरील संभाषणात, सोशल मीडियातील संदेशांतही याचा वापर केला आहे.

गडाख यांच्या अधिपत्याखालील संस्थांमधूनही ‘जय महाराष्ट्र’ म्हटले जाऊ लागले आहे. अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात हे बदल पहायला मिळत आहेत.

त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटल्यानंतर आता ‘राम राम’ म्हणून नमस्कार करण्याऐवजी ‘जय महाराष्ट्र’ म्हणू लागले आहेत.

तर निवडणुकीत गाजलेली ‘भोळ्या शंकरा’ ही रिंग टोन मागे पडून आता ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ने तिची जागा घेतली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment