शेतात गावात आणायला गेलेली 24 वर्षी महिला परत घरी आलीच नाही ..झाले असे काही …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- शेतात गवत आणायला गेलेल्या 24 वर्षीय महिलेचा पाय घसरून ती शेततळ्यात पडल्यामुळे शेततळ्याच्या पाण्यात बुडुन तिचा मृत्यू झाला.

ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडी येथे घडली असून सुप्रिया गुलदगड वय 24 वर्षे असे मयत महिलेचे नाव आहे

या घटनेबाबत पांडुरंग गुलदगड यांच्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि,

मयत सुप्रिया या आज सकाळी सात वाजता जनावरांना गवत आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या पण बऱ्याच वेळ होऊनही त्या घरी न आल्यामुळे त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली

असता गुलदगड यांच्या शेताशेजारील दरेकर यांच्या शेततळ्यात सुप्रिया या पाय घसरून पडल्याचे दिसले त्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्यातून घरच्यांनी बाहेर काढला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment