अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यात विवाहितेला धमकावून दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या डॉक्टरवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. सय्यद दाऊद मोमीन (सारोळे पठार) असे त्याचे नाव आहे. 

महिलेवर संगमनेरमध्ये उपचार सुरू होते. नंतर तिने डॉ. मोमीनकडे उपचार सुरू केले. सलाईनमधून गुंगीचे औषध देत त्याने या महिलेवर अत्याचार केले.

मोबाइलवर चित्रफीत काढून धमकावत कुटुंबीयांना दाखवण्याची व व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. डॉ. सय्यदने तिच्यावर दोन वर्षांपासून सारोळेपठार व संगमनेरच्या लॉजवर अत्याचार केले.

शनिवारी दुपारी कुक्कुटपालन शेडमध्ये बोलावून शरीरसंबंधाची मागणी करत मारहाण करण्यात आली.

नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून मुलांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. या छळास कंटाळून विवाहितेने अखेर पोलिसात फिर्याद दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment