अहमदनगर ब्रेकिंग : कापड व्यावसायिक बंधुंचे कोरोनाने निधन!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  नगर शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना बाधित पेशंटच्या मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. काल (गुरुवारी) सावेडी भागातील कापड व्यावसायिक असलेल्या दोन भावांचे निधन झाले.

कोरोनाची लागण झाली होती. भीस्तबाग परिसरात दोन भावांचे दोन कापड दुकाने आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. कोरोनाशी त्याची झुंझ अपयशी ठरली.

त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींनाही कोरोनाने घेरले असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. या भागातील मोठे प्रस्थ होते.

मात्र या दोघांचे निधन झाल्याचे वृत्त काल सायंकाळी समजल्याने हळहळ केली जात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे.

दरम्यान, काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३११४ इतकी झाली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment