महापलिकेचा गोंधळ ! ‘हे’ कोरोना तपासणी केंद्र बंद?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरात तर जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण आहेत.

परंतु अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा महानगरपालिकेच्या नियोजनाचा सावळागोंधळ समोर आला आहे.

आता महापालिकेमार्फत रामकरण सारडा वसतिगृहात सुरू असलेल्या कोरोना तपासणी केंद्रातील काम कर्मचाऱ्यांअभावी गुरूवारी थांबले आहे.

ऐन कोरोनाच्या प्रकोपात असे झाल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र प्रशासनाने काम थांबले नसल्याचे सांगत तांत्रिक अडचण असल्याची सारवासारव केली.

दरम्यान, या केंद्राची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी आणखी मनुष्यबळ आवश्यक असल्याचा अहवाल गुरूवारी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे पाठवला आहे.

यामुळे पुन्हा एकदा पालिकेचा नियोजनातील गोंधळ समोर आला आहे. या केंद्रात दररोज सुमारे २५० ते ३०० नागरिकांची कोरोनाची तपासणी केली जाते.

गुरूवारी या केंद्राचे नियोजन कोलमडल्यामुळे नागरिकांची गर्दी झाली होती. या केंद्रात दररोज २०० ते ३०० तपासण्या होत असल्या, तरी गुरूवारी दुपारपर्यंत अवघ्या ५६ नागरिकांचेच स्वॅब घेण्यात आले होते.

केंद्राची जबाबदारी असलेले अशोक साबळे यांनी आयुक्तांना एक प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रासाठी दोन पूर्णवेळ डाॅक्टर, ४ टेक्निशियन, रिपोर्ट वाटपासाठी दोन कर्मचारी, तसेच लिपिकाची आवश्यकता आहे.

कर्मचारी उपलब्ध झाले, तरच हे केंद्र सुरळीत चालेल. याप्रकरणी आयुक्त मायकलवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment