विनाअनुदानित शिक्षकांसाठी खुशखबर; सरकारने घेतला ‘हा’निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  अनेक दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. परंतु आता राज्यशासनाने काही निर्णय घेतले आहेत.

११ ऑगस्ट रोजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबत झालेल्या बैठकीत विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांबाबत ठोस व निर्णायक चर्चा झाली.

त्या अनुषंगाने १२ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत १३ सप्टेंबर २०१९ रोजी अनुदानास पात्र घोषित झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २४ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थ संकल्पात मंजूर झालेल्या वेतन अनुदानाचा पहिला टप्पा २० टक्के,

अंशत: अनुदानित शाळांना वाढीव २० टक्के म्हणजेच एकूण ३४५ कोटी रुपये टप्पा वितरण करण्यासंबंधी तोंडी मान्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

यामुळे विनाअनुदानित शिक्षकांसाठी ही बातमी दिलासादायक ठरली आहे. नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार बाळाराम पाटील, आमदार सतीश चव्हाण यांनी खूप पाठपुरावा केला.

विनाअनुदानित शिक्षक संघटनांनी मोलाचे कार्य केले. विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आदी सर्वांचे विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांनी आभार मानले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment