अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत दूध उत्पादक ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-पारनेर तालुक्यातील वडगाव आली येथील दूध उत्पादक कल्याण – विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर भाळवणी येथील दहावा मैल परिसरात झालेल्या अपघातात मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली.

संदीप आप्पासाहेब डेरे (वय ४५) असे अपघातात मृत झाल्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. कल्याण – विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरने (एम.एच. 46 बी.ए. 7637) वळण्यासाठी ब्रेक दाबल्याने

पाठीमागून भाळवणीकडे येत असलेल्या सदर संदीप डेरे यांच्या मोटारसायकलची धडक झाली. यात संदीप डेरे व मुलगी सानिका (17) हे दोघेही जखमी झाले.

त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच संदीप डेरे यांचे निधन झाले. तर मुलगी सानिका हिच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, दहावा मैल परिसरात असलेल्या पारस पाईप कंपनीसमोर नेहमीच मोठमोठे कंटेनर अनेक तास रोडच्या कडेला उभे असतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होतात.

त्यामुळे अनेकांचे याठिकाणी मृत्यू झाले आहेत. संदीप डेरे यांच्या नातेवाईकांनी काही काळ प्रेतासह अ‍ॅम्ब्युलन्स पारस कंपनीच्या गेटसमोर आणुन उभी केल्यामुळे

येथे तणाव निर्माण झाला होता. आमदार निलेश लंके घटनास्थळी पोहोचले व त्यांनी कंपनी प्रशासनाशी बोलल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment