चिंताजनक : एका दिवसात आठ जणांचा मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात २४ तासांत आणखी आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला. बळींची एकूण संख्या १३२ झाली आहे. गुरूवारी दिवसभरात नवे ५२८ रुग्ण आढळून आले.

उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३२०८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ७६, अँटीजेन चाचणीत २०२ आणि खासगी प्रयोगशाळेत २५० बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयातील चाचणीत आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील ३४, नगर ग्रामीण २४, कॅन्टोन्मेंट २, नेवासे १०, पारनेर ३, शेवगाव १, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत संगमनेर २४, राहाता २४, पाथर्डी १९, नगर ग्रामीण २, श्रीरामपूर १४, नेवासे २२, श्रीगोंदे १७, पारनेर ८, अकोले १७ राहुरी ६, शेवगाव २६, कोपरगाव ५, जामखेड १३ आणि कर्जत ५ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील २०७, संगमनेर ६, राहाता ८, पाथर्डी १, नगर ग्रामीण ५, श्रीरामपूर ३, कॅन्टोन्मेंट १, नेवासे ५, पारनेर ३, अकोले ४, राहुरी ३, शेवगाव ३, कोपरगाव १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ११ हजार ८०१ झाली आहे. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने गुरुवारी आठ हजारांचा टप्पा ओलांडला.

गुरुवारी एकूण ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८ हजार ४६१ इतकी झाली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment