Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ६०९ नवे रुग्ण, जाणून घ्या गेल्या 24 तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात  आज एकूण ५१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ९५०५ इतकी झाली आहे. 

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७३.८६ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६०९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२११ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २४२, अँटीजेन चाचणीत २०७ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२३,  संगमनेर १, पाथर्डी १, नगर ग्रा. ४, श्रीरामपूर ६, कॅन्टोन्मेंट ०४, अकोले १, शेवगाव १, मिलीटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २०७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर ३१, राहाता १४, पाथर्डी १३, श्रीरामपुर १७, नेवासा २१, श्रीगोंदा ०९, पारनेर ११, अकोले १५ राहुरी ०७, शेवगाव १७,  कोपरगाव १८, जामखेड १३ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १६० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८९, संगमनेर १२, राहाता ०४, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण २६, श्रीरामपुर ०४, नेवासा ०२, श्रीगोंदा ०१, पारनेर ०४, अकोले ०३, राहुरी ०२ कोपरगाव ०१, जामखेड ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा १९३, संगमनेर १८, राहाता १६, पाथर्डी ६१, नगर ग्रा. २५, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट २१, नेवासा ९, श्रीगोंदा २१, पारनेर १४, अकोले १९, राहुरी १७, शेवगाव ६, कोपरगाव २०, जामखेड ५, कर्जत ३६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: ९५०५
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: ३२११
  • मृत्यू : १५३
  • एकूण रूग्ण संख्या:१२८६९

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button