भारताचा माजी क्रिकेटपटू व्हेन्टिलेटरवर; जुलैमध्ये झाली होती करोनाची लागण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  करोनाच्या विळख्यातून अनेक दिग्गज सहीसलामत सुटले आहेत. काहींनी शेवटपर्यंत कोरोनाशी लढा दिला. सामान्य माणसापासून ते राजकीय, सामाजिक, क्रीडा, चित्रपट आदी क्षेत्रातील लोकांना कोरोना व्हायरसने बाधित केले आहे.

सध्या भारतीय संघाचे माजी कसोटीपटू आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले चेतन चौहान यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

त्यांची चौहान यांची प्रकृती खालावली असून दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

सध्या चौहान यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या चौहान यांना जुलैमध्ये करोनाची लागण झाली होती.

यानंतर उपचारासाठी ते लखनऊ येखील एका रुग्णालयात दाखल झाले. मात्र यानंतर चौहान यांना उच्च रक्तदाब आणि किडनीचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७० च्या काळात चेतन चौहान आणि सुनिल गावसकर यांची जोडी विशेष गाजली होती. १९६९ ते १९७८ या काळात चौहान यांनी भारतीय संघाकडून ४० कसोटी सामने खेळले होते.

गावसकर यांच्यासोबत चेतन चौहान यांनी १० शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तसेच या जोडीच्या नावावर ३ हजार धावाही जमा आहेत. याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्येही चेतन चौहान यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

१९८१ साली चौहान यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. दोनवेळा माजी खासदार म्हणून काम केलेले चेतन चौहान सध्या उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment